गळती थांबवायला उद्धव मैदानात

गळती थांबवायला उद्धव मैदानात

पक्षातील फूटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नाशिकला जाणार आहे. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. परंतु एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांनी बंड केल्यापासून शिवसेनेच्या ठाकरे गटाला गळती सुरू झाली आहे. ती गळती रोखण्यासाठी आता खुद्द उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून ठाकरेंना नाशिकमध्ये मोठा फटका बसला आहे. नाशिकमध्ये आमदार खासदार यांच्या पाठोपाठ नाशिक महापालिकेतील बारा नगरसेवक शिंदे गटात गेल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत राहील का ? असा प्रश्न उपस्थित होतं आहे. नाशिकच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले होते. मुंबई झालेल्या ठाकरे गटाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याबाबतही चर्चा करण्यात आली.

आगामी काळात महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकत असल्याने आता त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तातडीने तयारीला लागण्याचे ठरवले आहे.याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे उद्यापासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version