रोहन माळवदकर-जमादार यांना धमक्या

रोहन माळवदकर-जमादार यांना धमक्या

रोहन माळवदकर-जमादार कोरेगाव भीमा स्मृतिस्तंभ परिसरात राहत असून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. रोहन जमादार यांनी लिहिलेल्या ‘१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ या पुस्तकावर वादंग निर्माण झाला होता. त्यामुळे, गेल्या वर्षापासूनच रोहन जमादार याना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. यामुळे या परिसरातील जमीनधारकही भयग्रस्त झाले आहेत.

रोहन जमादार यांना बुधवारी दुपारी धमकी आली. त्या धमकीत, “तुला लवकरच गायब करणार आहे, तुझं मुंडकं उडवणार आहे, तुझ्यावर गोळ्या झडणार आहे.” अशी धमकी देण्यात आली असल्याचे रोहन यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे, या धमकीची रोहन यांनी स्थानिक पोलिसात तक्रारही केली असून त्यांना सध्या पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
दरम्यान, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी “वास्तविकता समोर येणं गरजेचं आहे, स्तंभ जाती- धर्मात वाटून घेता येत नाहीत आणि सरकारने या वादात हस्तक्षेप केला पाहिजे” अशी भूमिका ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीशी बोलताना मांडली आहे. तसेच, ‘रोहन जामदारांना मराठा क्रांती ठोक मोर्चाचा संपूर्ण पाठिंबा आहे’ असेही आबासाहेब पाटील म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version