धनंजय मुंडे आणि ऋषभ पंत उपचारासाठी मुंबईत

धनंजय मुंडे आणि ऋषभ पंत उपचारासाठी मुंबईत

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा ३० डिसेंबर रोजी मोठा अपघात झाला होता. ऋषभ पंत स्वतः गाडी चालवत दिल्लीहून आपल्या घरी परतत होता. यात फलंदाज ऋषभ पंत हा गंभीर जखमी झाला होता. आता पर्यंत ऋषभ पंत याच्यावर डेहराडून येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता पुढील उपचारासाठी त्याला मुंबई येथे हलवण्यात येणार असल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हा यांनी सांगितले आहे. म्हणून ऋषभ पंतला मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीचा मंगळवारी रात्री अपघात झाला. बुधवारी सकाळपर्यंत या अपघाताबद्दल कोणतीही माहिती समोर आली नव्हती परंतु आता या अपघातात धनंजय मुंडे यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समोर येतं आहे. अपघातानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर मला केवळ छातीला किरकोळ मार लागलायचं सांगिले होते. मात्र मुंडे यांच्या गाडीची अवस्था पाहता हा किरकोळ अपघात नसल्याचं दिसत असून धनंजय मुंडे यांना परळी इथून हवाईमार्गे मुंबईत आणण्यात आले आहे. त्यांच्यावर पुढील उपचार मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात होणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version