मोदींच्या हस्ते भारतीय विज्ञान काँग्रेसचं उदघाटन

मोदींच्या हस्ते भारतीय विज्ञान काँग्रेसचं उदघाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंदीय मंत्री नितीन गडकरी, नरेंद्र सिंघ तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देखील उपस्थित होते. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकोजी महाराज विद्यापीठात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितानां संबोधित देखील केले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी महिलांना महत्व देत विज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग महत्वाचा असल्याचं म्हणाले, तसेच भारताने विज्ञानक्षेत्रात मोठी प्रगती केली असुन ‘चिकित्सकता हाच विज्ञानाचा पाया’ असल्याचं त्यांनी सांगितले. वैज्ञानिक संशोधकांसाठी डेटा गोळा करणं महत्त्वाचं असून भारताकडे डेटाची मोठ्या प्रमाणात आहे.

तंत्रज्ञानामुळे देश प्रगतीपथावर आहे. विज्ञान, संशोधनाला आणखी देण्याचं आमचं ध्येय असल्याचं ते म्हणाले. भारताच्या विकासात वैज्ञानिकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सध्या विज्ञान क्षेत्रात भारत झपाटयाने जगातील अव्वल देशांमध्ये सामील होत आहे. १३० देशांच्या जागतिक निर्देशांकात भारत ४० व्या क्रमांकावर पोहोचला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version