अमरावती शहरात पाणीबाणी

अमरावती शहरात पाणीबाणी

अमरावती शहराला मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणातून सिमेंटच्या पाइपलाइनमधून पाणीपुरवठा केला जातो मात्र या सिमेंटच्या पाईपलाईन तीस वर्ष जुनी आहे. नवीन पाईप लाईन न टाकल्याने ही पाईपलाईन वारंवार फुटत आहे आणि त्यामुळे अमरावती शहराचा पाणीपुरवठा खंडीत होत आहे. अमरावती शहरात पाचव्या दिवशीही पाणीपुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे.

 नागरिकांना टँकरद्वारे अव्वाच्या सव्वा भावात पाणी विकत घ्यावे लागत आहे तर एरव्ही वीस रुपयाची मिळणारी कॅन आता ज्यादा पैसे देरून नागरिकांना विकत घ्यावी लागत आहे. पाणी नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पाणी टंचाईमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावाच लागतो परंतु तेथील अधिकारी या बाबत काहीच काम करत नसल्याच दिसुन येत आहे.

पाहा पाण्यासाठी करावा लागणार संघर्ष

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version