केंद्राकडून महाराष्ट्राला जीएसटी परतावा

केंद्राकडून महाराष्ट्राला जीएसटी परतावा

केंद्र सरकारने जीएसटी भरपाईची रक्कम राज्यांना दिली आहे. केंद्राकडून देशातील २१ राज्यांना जीएसटी परतावा देण्यात आला आहे. केंद्राकडून राज्याला १४ हजार कोटींचे जीएसटीचे अनुदान देण्यात आले आहे. वस्तू आणि सेवा कराच्या अनुदानाची ८६,९१२ कोटींची रक्कम केंद्र सरकारने मंगळवारी राज्यांना वितरित केली. यापैकी महाराष्ट्राच्या वाटय़ाला सर्वाधिक १४,१४५ कोटी रुपये आले आहेत. राज्याची २६,५०० कोटींची थकबाकी असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केला होता. यानुसार अद्यापही १२ हजार कोटींची राज्याची थकबाकी केंद्राकडे कायम आहे. तर राज्यांची नुकसानभरपाईची सर्व रक्कम वितरित केल्याचा दावा केंद्राने केला आहे. तर सर्व रक्कम दिल्याचा केंद्राने दावा केला आहे

केंद्राकडून देशातील २१ राज्यांना जीएसटी परतावा देण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. केंद्राने एकूण ८६ हजार ९१२ कोटी रुपये दिले असून यात महाराष्ट्राला सर्वाधिक परतावा मिळाला आहे.

आता केंद्राने जीएसटी भरपाईची रक्कम दिल्यानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रश्न विचारला आहे. आता तरी महाविकास आघाडी सरकारने इंधनावरचा कर कमी करावा, जनतेला दिलासा देणार का असा प्रश्न भाजपने विचारला आहे. महाराष्ट्राला जीएसटी परतावा मिळाला आहे तर आत्ता तरी इंधन स्वस्त करा अशी मागणी मुंबईभाजपाने केली आहे.

जीएसटी परताव्याचे राजकारण पाहूया

* केंद्राकडून राज्याला १४ हजार कोटींचे जीएसटीचे अनुदान
* सर्व रक्कम दिल्याचा केंद्राचा दावा
* १२ हजार कोटींची अदयाप थकबाकी – मुख्यमंत्री
* २६,५०० कोटींपैकी राज्याला मिळाले १२ हजार कोटी
* ८६,९१२ कोटींचा जीएसटी परतावा केंद्राकडून राज्यांना वितरित
* जीएसटी परताव्यावरून केंद्र आणि राज्यात कायम वाद

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version