मनसे नेत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

मनसे नेत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर गुरुवारी निर्णय होणार झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने संदिप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या जामीनाला मुंबई पोलिसांनी जोरदार विरोध केला होता. मुंबई सत्र न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर निर्णय देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून मात्र या दोन्ही मनसे नेत्यांच्या अटकपूर्व जामिनाला कडाडून विरोध करण्यात आला होता. गेल्या सुनावणीत अटकपूर्व जामिन अर्जावरील निकाल १९ मे रोजी देणार असल्याचं मुंबई सत्र न्यायालयाच्या वतीनं कळवण्यात आलं होतं. त्याचनुसार संदीप देशपांडे आणि संदीप धुरी यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने संदिप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील शिवाजी पार्क येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचं सांगितलं. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याची कबुलीही पोलिसांना दिली. मात्र, काही वेळानंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी गाडीत बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु, गाडी न थांबवताच ते तिथून निघून गेले. तसेच त्यांची गाडी भरधाव वेगानं जात असताना एक महिला पोलीस जखमी झाली. पोलिसांनी याप्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबईतील सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मुंबई सत्र न्यायालयाने १९ मे रोजी त्यांचा अटकपुर्व अर्ज मंजुर केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version