मालेगाव स्फोटात खोटी साक्ष देण्यासाठी एटीएसकडून छळ

मालेगाव स्फोटात खोटी साक्ष देण्यासाठी एटीएसकडून छळ

मालेगाव स्फोट प्रकरणी मुंबईस्थित विशेष न्यायालयासमोर या प्रकरणाताली साक्षीदाराने खळबळजनक खुलासा केला आहे. मालेगाव स्फोट प्रकरणात खोटी साक्ष देण्यासाठी एटीएसकडून छळ केला असल्याचा गौप्य स्फोट याप्रकरणातील साक्षीदाराने मुंबईस्थित विशेष न्यायालयासमोर केला आहे.

मालेगाव स्फोटप्रकरणी साक्ष देण्यासाठी संघाच्या नेत्यांना अडकवण्यासाठी कोठी साक्ष देण्याचा दबाव दिला असल्याचे साक्षीदाराने न्यायालयासमोर सांगितले आहे. तसेच देवधर, इन्द्रेश कुमार, असीमानंद यांना या कटात गोवण्याची योजना आखण्यात आली असल्याचेही साक्षीदाराने सांगितले आहे.

मालेगाव स्फोटप्रकरणी तत्कालीन पोलिसांनी एक साक्षीदाराचा छळ केला असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. मालेगावमधील स्फोटप्रकरणाचा तपास एटीएसने केला होता. दरम्यान आता एनआयएच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version