दुष्काळी भागात अधिकाऱ्यांची मटणपार्टी की पाहणीदौरा ?

दुष्काळी भागात अधिकाऱ्यांची मटणपार्टी की पाहणीदौरा ?

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा तिढा सुटण्यात अनेक अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. राज्यात पडलेला ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पहायला मिळाले. दरम्यान दुष्काळ पडलेल्या भागाची पाहणी होत आहे. मात्र बुलढाण्यात या पाहणीच्या नावावर केंद्रिय पथकाच्या अधिकाऱ्यांनी चक्क मटणावर ताव मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत बळीराजाचा घाम अतिवृष्टीत वाहून नेला आहे. हाताशी आलेली पिके या पावसाने मातीमोल करून शेतकऱ्यांना अडचणीच्या खाईत लोटले आहे.

या पाश्वभुमीवर दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाचे अधिकारी खामगावात आले होते. या पथकाने रस्त्यालगतच्या शेताची काही मिनीटांची पाहणी केल्यानंतर चक्क मटणावर ताव मारला आहे. या घटनेने शेतकऱ्यामध्ये संताप व्यक्त होत आहे.

गावरान कोंबडे या अधिकाऱ्यांना जेवणात देण्यात आले होते. केंद्रीय पथक हे शेतकऱ्यांच्या शेतातील पाहणी करून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आले की मटण पार्टी करण्यासाठी आले असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

खामगावच्या विश्राम गृह येथे मटणावर ताव मारून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हे कृत्य म्हणजे शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा प्रकार आहे. अशा भाषेत टीका या अधिकाऱ्यांवर होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version