मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या मुंबई विभागात बॉम्बशोधक व नाशक पथक दाखल होणार

मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या मुंबई विभागात बॉम्बशोधक व नाशक पथक दाखल होणार

मुंबईमध्ये बॉम्ब हल्ले झालेले आहेत. अनेक घडामोडींमुळे सतर्क राहण्याचा इशारा ही देण्यात आले आहे. या आधी झालेल्या हल्ल्यांमध्ये रेल्वे स्टेशनचाही समावेश आहे. त्यामुळे मुंबईत सुरक्षा यंत्रणेनेवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे.  मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या मुंबई विभागात पहिल्यांदाच बॉम्बशोधक व नाशक पथक दाखल केले जाणार आहे.

बॉम्बशोधक व नाशक पथक दाखल

मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या मुंबई विभागात पहिल्यांदाच बॉम्बशोधक व नाशक पथक दाखल केले जाणार आहे. बॉम्ब निकामी करण्यासाठी ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. २० सप्टेंबरला या नवीन सुरक्षा यंत्रणेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

रेल्वे स्थानक आणि हद्दीत एखादी बॉम्बसदृश वस्तू  आढळल्यास किंवा बॉम्ब ठेवल्याचा फोन नियंत्रण कक्षात आल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल लवकर पोहचू शकत नाही. अशा वेळेस बॉम्ब शोधण्यासाठी किंवा निकामी करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागते.

मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडे सध्या श्वान पथक आहे, मात्र बॉम्ब शोधक-नाशक पथक नाही. त्यामुळे यात बराच वेळ जातो. पश्चिम रेल्वेकडेही सध्या अशी सुरक्षा यंत्रणा नाही. मुंबई उपनगरीय रेल्वेचा आवाका पाहता स्वतंत्र बॉम्ब शोधक व नाशक पथक दाखल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यात एका वाहनामध्ये सर्व यंत्रणा सज्ज असेल. यात दोन श्वान, एक बॉम्ब सूट, ब्लँकेटसह अन्य सुरक्षा यंत्रणांचा समावेश असतो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version