बीग बींचा मेट्रो कारशेडला पाठिंबा, मनसेची ‘ही’ प्रतिक्रीया

बीग बींचा मेट्रो कारशेडला पाठिंबा, मनसेची ‘ही’ प्रतिक्रीया

आरे मध्ये होत असणाऱ्या कारशेडमुळे राजकिय वातावरण तर तापू लागले आहेच पण यासाठी सर्वच स्तरातून प्रतिक्रीया नोंदवल्या जात आहेत. तर भाजप सोडून सर्व राजकीय पक्षांचा कारशेडला विरोध आहे. अमित ठाकरे यांनी ही यावर आवाज उठवला आहे. आदित्य ठाकरेही यावरून चांगलेच ट्रोल झाले आहेत. तर बीग बींनी या कारशेडला समर्थन देत असल्याचे ट्वीट केले आहे. त्यानंतर मनसेने अमिताभ बच्चन यांनी या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.

बीग बींचा मेट्रो कारशेडला पाठिंबा

आरे मध्ये होणाऱ्या मेट्रो कारशेडला भाजप सोडून सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था विरोध करीत आहेत. याचं कारशेडला मात्र महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून समर्थन दिलं आहे.

काल अमिताभ बच्चन यांनी ट्विटरद्वारे आपल्या मित्राच उदाहरण देत मेट्रोने तो कसा लवकर उपचार घेण्यासाठी दवाखान्यात पोहोचला हे सांगितलं आणि मी माझ्या बगीच्यामध्ये झाडं लावली आपण लावली काय? अस ट्विट केलं

त्यावर मनसेने अखिलेश चित्रे यांनी बिग बी यांनी 2010 मध्ये याच मेट्रोला विरोध केला होता असं सांगत महानायक अमिताभ बच्चन हे इम्पोर्टेड केलेल्या महागड्या गाड्यातून कुटुंबासह प्रवास करतात. तसेच आपल्या बगीच्यामध्ये लावलेले झाड नैसर्गिक झाडांना पर्याय असू शकत नाही असं म्हणत मनसेचे अखिल चित्रे यांनी रिट्विट केलं आहे तसेच महानायक यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version