मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा!

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा!

महाराष्ट्रात एकीकडे अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला तर मराठवाड्यात याच्या उलट परिस्थितीने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पावसाअभावी पीके किडीच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडली आहेत. वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पण पीके वाळून जात असताना याकडे मुख्यमंत्री लक्ष देतील का? काही घोषणा करतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

नांदेड जिल्ह्यात आठ लाख 48 हजार 927 हेक्टर सर्वसाधारण पेरणीक्षेत्र असलेल्या जिल्ह्यात आजअखेर जवळपास सर्वच क्षेत्रावर पेरणी झाली आहे. परंतु पावसाअभावी पुन्हा एकदा पीके संकटात सापडली आहेत. आगामी दोन – चार दिवसांत पाऊस झाला नाही तर ते वाळण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

या भागात पावसाने दगा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घटणार हे निश्चित आहे. पेरणीला विलंब झाल्यामुळे यापूर्वीच शेतकऱ्यांनी उडीद, मुगाऐवजी सोयाबीनच्या पेरणीवर भर दिला होता. मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे सर्वच खरीप पिके धोक्यात आली आहेत. आगामी तीन – चार दिवसांत पाऊस झाला नाही पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ येईल अशी भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांत सरासरी अत्यल्प पर्जन्यमान आहे. त्यामुळे अनेक भागात पाण्याअभावी पीकेही वाळत आहेत. जिल्ह्यातील कंधार, लोहा, मुखेड, भोकर, नायगाव, धर्माबाद, हदगाव अर्धापूर, उमरी या तालुक्यात पिकांची स्थिती खूप वाईट झाली आहे. मूग आणि उडीद पिके तर हातचीच गेली आहेत. तर कापूस व सोयाबीन या पिकावर अळी व किडीचा मोठा प्रादुर्भाव आहे.

तसेच पावसाअभावी या पिकांची वाढही खुंटली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 30 व 31 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुराने वाहून गेलेले पिके लक्षात घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. पण मराठवाड्यातील पाण्याअभावी वाळलेली पीके पाहून तरी सरसकट कर्जमाफी व पीकविमा मंजूर करण्याची घोषणा करतील हे पहावं लागणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version