मामानेच केला अकरा वर्षीय भाचीवर बलात्कार

मामानेच केला अकरा वर्षीय भाचीवर बलात्कार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आल्याने खळबळ उडाली. मावस मामानेच आपल्या अकरा वर्षीय भाचीवर बलात्कार केला.

 

चाकण पोलिसांना आरोपीला अटक केली. आरोपी मामा आणि पीडित मुलीचे कुटुंब हे एकच परिसरात राहतात.

 

तसेच जवळचे नाते असल्याने आरोपी पीडित मुलीच्या घरी वेळोवेळी येत असे. या आरोपी मामाने जूनच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या अकरा वर्षीय भाचीवर

अतिप्रसंग केला होता.

 

घरात कोणी नसताना असे कृत्य करून, कोणाला सांगू नये यासाठी त्याने या चिमुरडीला धमकीही दिली होती. मात्र, मुलीने आईला सांगितले त्यामुळे हा सुन्न करणारा

प्रकार उघड झाला आहे.

 

याप्रकरणी शुक्रवारी रोजी पीडित मुलीच्या आईने आपल्या मावस भावा विरोधात चाकण पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या

ठोकल्या. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version