11 हजार दिव्यांच्या दीपोत्सवात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

11 हजार दिव्यांच्या दीपोत्सवात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली

विचार क्रांती अभियानाची मशाल विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात तब्बल 11 हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवात विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक,नागरिक सामील झाले होते. विद्यार्थ्यांच्या जीवनातील अंधार दूर होऊन वाट प्रकाशमान होण्याच्या उद्देशासाठी हा आगळा वेगळा दीपोत्सव करण्यात आला.

हा दीपोत्सव सोहळा अतिशय नयनरम्य होता. हा दीपोत्सव पाहण्यासाठी हिंगोलीकरांनी गर्दी केली होती. हिंगोली येथे पहिल्यांदाच आदर्श एजुकेशन सोसायटीच्या वतीने विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना प्रेरणा देणारा दीपोत्सव साजरा करण्यात आला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version