अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार, शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारेंचा इशारा

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार, शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारेंचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी दिलाय. मुंबईतल्या शाळांना देय असलेली अकरावी ऑनलाइन प्रक्रियेतील शुल्काची रक्कम वर्ष उलटूनही अद्याप मिळालेली नाही. दरवर्षी मुंबई महानगर क्षेत्रात दहावी उत्तीर्ण होऊन हजारो विद्यार्थी अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश घेतात. त्यांची एकत्रित रक्कम लाखो रुपये इतकी असूनही ही अपेक्षित रक्कम शिक्षकांना मिळालेली नाही.

त्यामुळे आक्रमक झालेल्या शिक्षकांनी हा पविञा घेतलाय. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने याबाबत तातडीने कार्यवाही करून मुंबईतल्या शाळांना त्यांचा हिस्सा द्यावा. अन्यथा पुढील शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार टाकू याबाबत बोरनारे यांनी शिक्षण विभागाला निवेदनही दिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version