मृत मुलीच्या दु:खा प्रसंगीही वडिलांनी समाजापूढे ठेवला सामाजीक आदर्श

मृत मुलीच्या दु:खा प्रसंगीही वडिलांनी समाजापूढे ठेवला सामाजीक आदर्श

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

ठाण्यात दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. अशा या दुःखच्या वेळीही तिच्या कुटुंबियांनी तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्महत्या झाल्यानंतर तिच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी तिच्या कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयाने समाजाला एक आदर्श घालून दिला आहे.

रचना सूर्यकांत शिंगे हे या मुलीचे नाव आहे रचना अभ्यासात हुशार आणि एक आदर्श विद्यार्थिनी होती. खेळात, अभ्यासात आणि वक्तृत्व कलेत तिला नेहमी पारितोषिके मिळत होती. दुपारी अचानक काही कारणास्तव तिने राहत्या घरी गळफास घेतला. तिच्या या प्रकारामुळे तिचे कुटुंब आणि बाळकुम गावावर शोककळा पसरली.

या दुःखाच्या वेळेतही तिचे वडील सूर्यकांत शिंगे यांनी तिचे नेत्रदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. रचनाला नेत्र रुपी जीवंत ठेवण्याच्या निर्णयाला रचनाच्या मित्र, परिवराने, नातेवाईकांनी एक आदर्श असल्याचे सांगत, अशा गोष्टींचे अनुकरण नक्कीच झाले पाहिजे असे सांगितले.

तिच्या आत्महत्येच्या माहितीनंतर शाळेतील शिक्षाकांनी देखील हळहळ व्यक्त केली. रचनाच्या आत्महत्ये मागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version