यंदा राज्यात पडणार 102 टक्के पाऊस

यंदा राज्यात पडणार 102 टक्के पाऊस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मान्सून 2, 3 आणि 4 जूनपासून संपूर्ण राज्यात दाखल होईल, असा अंदाज कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला. शिवाय यावर्षी राज्यात सरासरीच्या 102 टक्के पाऊस होईल, असंही साबळे यांनी म्हटलं. शेतकऱ्यांसाठी हा उत्तम हंगाम आहे.

 

राज्यात 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर पेरणी करावी, असा सल्ला साबळे यांनी दिला. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाच्या खंडाचा कालावधी मोठा असल्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली. कमी दिवसात जास्त पाऊस पडणार आहे. मात्र काही काळ पावसाचा खंडही असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version