पेंग्विन दर्शनाच्या 100 रुपयांच्या दरवाढीला भाजपचा विरोध

पेंग्विन दर्शनाच्या 100 रुपयांच्या दरवाढीला भाजपचा विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील राणीच्या बागेत प्रवेश आणि पेंग्विन पाहण्यासाठी सध्या 5 आणि 2 रुपये शुल्क असून आता थेट 100 रुपये एवढी वाढ होणार आहे.

 

पेंग्विन दर्शनासाठी लहान मुलांना 50 रुपये तर प्रौढांना शंभर रुपये आकारण्याते प्रस्वावित होते. हे दर 1 एप्रिलपासून लागू होणार होते.

 

याबाबत गटनेत्यांमध्ये बैठक झाली आणि यात बदल करण्यात आलेत. आता मुलांसाठी दोन रुपये शुल्क 25 रुपयांवर, प्रौढांसाठी प्रत्येकी शंभर रुपये आणि कुटुंबाला 125 रुपये असे दर

आकारण्यात येणार आहे. तसेच राणीबागेत मॉर्निंग वॉकसाठीही मासिक शुल्क 30 ऐवजी दीडशे रुपये करण्यात आले.

 

गटनेत्यांच्या बेठकीत केलेल्या बदलांना स्थायी समिती आणि महापालिकेच्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळल्यानंतरच ही दरवाढ होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version