रुग्णालयातूनच ‘त्या’ने दिला 10वी चा पेपर

रुग्णालयातूनच ‘त्या’ने दिला 10वी चा पेपर

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

दहावीच्या एका विद्यार्थ्याला रुग्णालयातून बोर्डाचा पेपर द्यावा लागतोय. पेपर देऊन परतताना गणेशचा पुण्यातील चाकणमध्ये अपघात झाला होता. गणेशला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होतं. यादरम्यान, गणेशला महत्त्वाच्या दहावीच्या पेपरला मुकावे लागू नये म्हणून त्याला रुग्णालयातून पेपर लिहण्याची परवानगी मिळालीय.

विद्यार्थ्याच्या दहावीच्या परीक्षेचा प्रश्न होता म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट शिक्षण मंत्री विनोद तावडेंशी संपर्क साधला आणि रुग्णालयातून पेपर लिहिण्याची परवानगी विद्यार्थ्याला देण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version