अमृता फडणवीसांना 1 कोटी लाचेची ऑफर

अमृता फडणवीसांना 1 कोटी लाचेची ऑफर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी देण्यात आली आहे. डिझायनर महिलेने अमृता यांना एक कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर दिली आहे. यासंदर्भात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विधिमंडळातील सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रकरण सांगितले.

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला 1 कोटी रुपयांची लाचेची ऑफर दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. अनिक्षा असं संबंधित महिला डिझायनरचं नाव असून वारंवार ही ऑफर देण्यात आल्याने अमृता फडणवीस यांनी वैतागून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यामुळे डिझायनर महिला आणि तिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. मागील 16 महिन्यांपासून अनिक्षा ही अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली होती. दरम्यान, आपल्या वडिलांसंदर्भात सुरू असलेल्या खटल्यात शिथिलता आणण्यासाठी अनिक्षाने अमृता फडणवीसांना 1 कोटी रुपायांच्या लाचेची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version