Pune Mayor : पुण्याचा कारभारी ठरला! भाजपच्या मंजुषा नागपुरे बिनविरोध महापौर, तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर

राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदासाठी शीतल चव्हाण आणि उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट यांचा भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
Pune Mayor : पुण्याचा कारभारी ठरला! भाजपच्या मंजुषा नागपुरे बिनविरोध महापौर, तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर

खूप प्रतिक्षेनंतर अखेर पुण्याचा कारभारी ठरला आहे.  पुण्याच्या महापौर पदाची निवडणूक बिनविरोध असून पिठासीन अधिकाऱ्यांनी  उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ पंधरा मिनिटांची वेळ दिली होती.यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी अजित पवार व सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बिनविरोध निवड करण्याची विनंती केली होती. 

या विनंतीला सर्व पक्षांनी मान देत काँग्रेसकडून महापौर पदासाठी अश्विनी लांडगे तर उपमहापौर पदासाठी भरलेला साहिल केदारी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदासाठी शीतल चव्हाण आणि उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट यांचा भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपच्या मंजुषा नागपुरे पुण्याच्या बिनविरोध महापौर म्हणून निवड झाली आहे.  तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे परशुराम वाडेकर बिनविरोध उपमहापौर म्हणून निवडून आले आहेत. 

दरम्याने याचवेळी एका घटनेने लक्ष वेधून घेतले आहे. पिठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांनी अभिनंदनासाठी दिलेला पुष्पगुच्छ महापौर नागपूरे यांनी स्विकारला नाही. त्यामुळे आता याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version