माजी आमदार वारिस पठाण यांना काळं फासलं

माजी आमदार वारिस पठाण यांना काळं फासलं

मुंबईमधील एमआयएमचे नेते आणि भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या चेहऱ्यावर एका अज्ञात तरुणाने काळं फासले. वारीस पठाण हे आज इंदूरयेथील खजराना दर्ग्यात गेले होते. यावेळी एका तरुणाने त्यांच्या चेहऱ्यावर काळं फासले आणि तेथून पळून गेला. या घटनेमुळे एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

आमदार वारीस पठाण खजराना दर्ग्यात चाद चढविण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेदेखील होते. दर्ग्यातून बाहेर आल्यावर वारीस पठाण यांच्यासोबत अनेक जण फोटो काढण्यासाठी व्यस्त होते तर काही त्यांना पुष्पगुच्छ देत होते. यावेळी एका तरुणाने वारीस पठाण यांच्या चेहऱ्यावर काळं फासून तेथून पळ काढला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version