Red Facepack: चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा? वापरा जादुई रेड फेसपॅक!

Red Facepack: चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा? वापरा जादुई रेड फेसपॅक!

1. गुलाब फेसपॅक (Rose Face Pack)

साहित्य:
5-6गुलाबाच्या ताज्या पाकळ्या
2चमचे दूध
1 चमचा मध
1 चमचा बेसन

कृती:
गुलाबाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा.
त्यात दूध, मध आणि बेसन मिसळा.
चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा.
कोमट पाण्याने धुवा.
फायदे: गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. गुलाब फेसपॅक त्वचेला हायड्रेट करून नैसर्गिक चमक देतो.

2. स्ट्रॉबेरी फेसपॅक (Strawberry Face Pack)

साहित्य:
2-3 स्ट्रॉबेरी
1 चमचा दही
1 चमचा मध

कृती:
स्ट्रॉबेरी ब्लेंडरमध्ये बारीक करून त्यात दही व मध मिसळा.
हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे ठेवा.
कोमट पाण्याने धुवा.

फायदे: स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेला उजळवतात आणि मुरुमांची समस्या दूर करतात.

3. टोमॅटो फेसपॅक (Tomato Face Pack)

साहित्य:
1 लहान टोमॅटो
1 चमचा लिंबाचा रस
1 चमचा गव्हाचे पीठ

कृती:
टोमॅटोचे पल्प काढा आणि त्यात लिंबाचा रस व गव्हाचे पीठ मिसळा.
हा पॅक चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे ठेवा.
थंड पाण्याने धुवा.

फायदे: टोमॅटोमध्ये लायकोपीन असते, जे टॅनिंग कमी करून त्वचेला स्वच्छ आणि फ्रेश ठेवते.

4. लाल चंदन फेसपॅक (Red Sandalwood Face Pack)

साहित्य:
1 चमचा लाल चंदन पावडर
2 चमचे गुलाबपाणी
1 चमचा दही

कृती:
लाल चंदन पावडर, गुलाबपाणी आणि दही एकत्र मिसळा.
चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा.
स्वच्छ पाण्याने धुवा.
फायदे: लाल चंदन त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे टॅनिंग दूर करून त्वचेला गुळगुळीत आणि उजळ बनवते.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version