नवी दिल्ली : Discount in Air Fare : प्रेमाच्या महिन्यात पर्यनस्थळी फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्या प्रेमीजनांसाठी खुशखबर आहे. विमान कंपन्यांनीही आता भरघोस ऑफर्स देत व्हॅलेंटाईन डेची तयारी केली आहे. अनेक विमान कंपन्या भाड्यात सवलतींसह विविध ऑफर्स देत आहेत. इंडिगो एअरलाईन्सने 50 टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे. तर, एअर इंडियाने देखील एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर जोडप्यांसाठी आहेत. चला, कोणत्या एअरलाइन्स कोणत्या ऑफर्स देत आहेत, ते जाणून घेऊया.
व्हॅलेंटाईन डे निमित्त विमान कंपन्यांनीही पर्यटकांवर ऑफर्सचा वर्षाव केला आहे. इंडिगो आणि एअर इंडियाने केवळ भाडे कमी केले नाही तर, जोडप्यांना विशेष ऑफर देखील दिल्या आहेत. इंडिगोने भाडे 50 टक्क्यांनी कमी केले आहे. तथापि, ज्या ऑफर्स दिल्या जात आहेत त्यामध्ये अनेक अटी देखील आहेत.
हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : मुख्य पुरोहिताला किती वेतन मिळते? जाणून घ्या आचार्य सत्येंद्र दास यांचा पगार
ठळक मुद्दे
1. इंडिगो: भाड्यात 50% पर्यंत सूट
इंडिगो एअरलाइन्सने दोन प्रवाशांच्या बुकिंगवर मूळ भाड्यावर 50% पर्यंत सूट जाहीर केली आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. ही ऑफर सुरू झाली आहे आणि 16 फेब्रुवारी 2025 (रात्री 11:59) पर्यंत राहील. तथापि, ही सवलत फक्त निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरच उपलब्ध असेल. प्रवासाची तारीख बुकिंग तारखेपासून किमान 15 दिवसांनंतरचे असावे.
इंडिगो हीदेखील सूट देत आहे
हेही वाचा – 20 वर्षांपूर्वी त्सुनामीनंतर या IAS अधिकाऱ्याने 'तिला' ढिगाऱ्यातून उचलून आणलं; आता तिच्या लग्नाला हजर राहिले
2. एअर इंडिया: एकाच वेळी अनेक ऑफर्स
व्हॅलेंटाईन डे निमित्त एअर इंडियानेही अनेक ऑफर्स दिल्या आहेत. जर तुम्ही देशांतर्गत मार्गांवर जोडीदारासोबत तिकीट बुक केले तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या तिकिटावर 10% पर्यंत सूट मिळेल. ही ऑफर फक्त निवडक देशांतर्गत मार्गांवरच वैध आहे. तुमच्या पसंतीची सीट निवडल्यास 20% सूट दिली जाईल.
एअर इंडिया अॅपद्वारे तिकिटे बुक केल्यास आणखी बरेच फायदे होतील. ही ऑफर 11 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे आणि 14 फेब्रुवारीपर्यंत चालेल. ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला LOVEAI कोड वापरावा लागेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.