नाशिकमध्ये लसीकरणाला गुरुवारपासून सुरुवात

नाशिकमध्ये लसीकरणाला गुरुवारपासून सुरुवात

राज्यात १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील लहान मुलांसाठी कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे काल नाशिकमध्ये लसीकरण सुरू झाले नाही. तर आजपासून नाशकात लहान मुलांसाठी लसीकरण सुरू झाले आहे.

नाशिकमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करून १२ ते १४ वयोगटातील मुलांना लस घेता येणार आहे. आज नाशिकमध्ये लसीकरणाच्या पहिल्या दिवशी लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

देशातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण मोहिम सुरू केली. त्यानुसार संपूर्ण देशभरात टप्प्या टप्प्याने नागरिकांना कोरोना लसीचे दोन मात्रा देण्यात येत आहेत. त्यानंतर आता १५ वर्षांखालील १२ ते १४ वयोगटातील शाळकरी मुलांना कोरोना लस घेता येणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. तसेच ६० वर्षांवरील व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version