सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. तर यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुणे महापौर मुरलीधर मोहोळ आदि उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वांना अभिमान वाटेल असा हा सोहळा आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव त्यांच्याविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी देण्यात आले. फुले दाम्पत्याने समाजाच्या आयुष्यात फुले फुलविण्याचा, संसारात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यापीठाने पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न राहता सावित्रीबाईंच्या कार्याबाबत आदर वाटेल आणि त्यांच्या नावाल साजेसे असे अभ्यासक्रम असावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
सावित्रीबाई फुले यांनी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे इतरांना प्रकाश देण्याचे कार्य केले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजासाठी कार्य केले. प्रत्येकाला मर्यादेचे भान आहे आणि भेद बाजूला ठेवून धर्माधर्मामध्ये भांडणे लावू नका, असेही फुले दाम्पत्यांनी सांगितले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.