आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू

आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू

राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय होत आहेत. तसेच राज्यातील भ्रष्टाचार, पेपरफुटी प्रकरण या सर्व मुद्द्यांवर चर्चा आजपासून सुरू होणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या हिवाळी अधिवेशनात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होत आहे. मात्र पुढील अधिवेशन नागपूरातच होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

तसेच हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व मुद्यांवर चर्चा करणार असून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणार असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. मात्र विरोधी पक्षनेत्यांनी अधिवेशनात आक्रमक होण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे आजपासून सुरू होणारे यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरत आहे का, यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्ष आणि भाजप यांच्याकडे अनेक मुद्दे आहेत. राज्यातील कर्मचाऱ्यांचा संप, पेपरफुटी प्रकरण, ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येणार असल्यामुळे सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version