आपण आतापर्यंत विविध विवाह सोहळे पाहिले असतील. एका अनोख्या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा विवाह सोहळा कोणत्याही हॉलमध्ये झाला नाही तर हा विवाह चक्क डम्पिंग ग्राऊंडवर पार पडलाय. डम्पिंग यार्ड म्हणताच दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य असं काहीसं चित्र समोर येतं पण परभणी जिल्ह्यातील मानवत येथील कचरा डेपो मात्र प्रेक्षणीय स्थळ बनलंय. एवढंच काय कमी होतं, की या ठिकाणी आता चक्क विवाह सोहळे आयोजित करण्यात आलेत. या सोहळ्याच्या माध्यमातून पालिकेतर्फे नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समाजवून सांगितले जातंय. यावेळी नवं दाम्पत्यानं घनकचरा प्रकल्पाची पूजा देखील केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.