सुनक यांना सीटबेल्ट न लावणं पडलं महागात

सुनक यांना सीटबेल्ट न लावणं पडलं महागात

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना सीटबेल्ट न लावल्याबद्दल पोलिसांनी दंड ठोठावला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना सोशिअल मीडियासाठी व्हिडीओ तयार करताना सीट बेल्ट न लावता कारमध्ये बसल्याबद्दल ब्रिटिश पोलिसांकडून दंड ठोठावण्यात आला आहे.
सुनक यांनी गुरुवारी इंग्लंडच्या उत्तर भागात प्रवास करताना त्यांच्या कारमध्ये एक व्हिडीओ चित्रित केला. हा व्हिडीओ सोशिअल मीडियावर प्रसारित झाल्यावर विरोधी पक्षाने हा मुद्दा समोर आणल्यानंतर सुनक यांना पोलिसांकडून दंड ठोठावण्यात आला.

‘सुनक यांनी काही वेळासाठीच सीट बेल्ट काढला होता आणि पंतप्रधान सुनक यांनी याप्रकरणी माफी मागितली असून १०० पौंडाचा दंडही भरला आहे’, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली आहे.

 

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version