जळगावात आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटसवरून वाद उद्भवल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, हा वाद उद्भवल्यानंतर जळगांव येथील शिरसोली गावात रात्री ११ वाजेच्या सुमारास समाज कंटकांनी दोन गटात दगडफेक केली. या दगडफेकीमुळे दोन वाहनांच्या काचा फुटल्या असून एक तरुण जखमी झाला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. घटनास्थळी सध्या शांतमय वातावरण आहे. या वादात आधी आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस ठेवणा-या तरुणाला मराठी शाळेच्या मोकळ्या मैदानात काही तरुणांनी मारहाण केली असल्याची माहिती समोर आली. यावेळी काही तरुणांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. मात्र, नंतर अफवा पसरवून मलीकनगर व नसीमन कॉलनी या परिसरात काही समाज कंटकांनी दगडफेक केली असल्याचं कळतंय.
मात्र, शिरसोली गावात हनुमान जंयती निमित्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे एमआयडीसी पोलीस लागलीच घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आली. याप्रकरणी, दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे डिजिटल माध्यमांमुळे वाद होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.