गेल्या काही दिवसापुर्वी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यानंतर आता राजपत्रित वर्ग-2 नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे मुद्यावरुन राज्यातील 2200 नायब तहसीलदारआणि 600 तहसीलदार यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते. त्यामुळे ग्रेड पे 4300 रुपयांवरुन 4800 रुपये वाढवण्याची त्यांची मागणी आहे.
नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरुन वाढवून वर्ग दोनवर 1988 साली राज्यसरकारकडून करण्यात आला होता. मात्र त्यांची वेतनवाढ ही करण्यात आली नव्हती. मागील अनेक वर्षे राज्यातील नायब तहसीलदार हे वर्ग दोन या पदावर काम करत आहे. मात्र त्यांचे वेतन हे वर्ग तीनच्यानुसार येत आहे. सध्याची त्यांची मागणी मान्य केल्यास राज्यातील 2200 नायब तहसीलदारांना त्याचा फायदा होणार आहे.
तहसीलदारांच्या बेमुदत कामबंद आंदोलनाचा परिणाम जमीन महसुलाची कामे, अतिवृष्टीचे पंचनामाचे, कारवाईची कामे, स्वस्त धान्य दुकानदारांवर देखरेख करुन काळाबाजार रोखणे, निवडणूक अधिकारी म्हणून तालुक्याची जबाबदारी पार पाडणे, तहसील कार्यालयातील विविध विभागातून दिले जाणारे दैनंदिन दाखले या सर्व कामांवर होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.