एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

  एसटी कर्मचाऱ्यांच्या २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. मात्र एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करावे आणि एसटी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ या मागण्यांसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

 एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी सागंलीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चांगलेच तापले आहे. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी पुण्याला जाणारी शिवशाही बस रोखत सांगली आगाराच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. या दरम्यान पोलीस आणि एसटी आंदोलकांमध्ये वादही झाला. संप काळात बस सोडणार नसल्याचा एसटी कर्मचाऱ्यांनी निर्धार केला असल्यामुळे सांगली बस आगारात मोठा गोंधळ उडाला. मात्र अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत ही बस पुण्याकडे रवाना केली.

  तसेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरयेथील एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या आजीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आजी म्हणते, आत्महत्या करू नका, संप मागे घेऊ नका. असे म्हणत आजीने एसटी कर्माचाऱ्यांच्या संपाला पाठींबा दिला आहे.

  कोल्हापूरमध्येही एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कोल्हापूरमध्ये एसटी बंद असल्याने खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरू आहे. जवळच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून तिप्पट दर आकारले जात आहे. त्यामुळे सामान्यांना प्रवासासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. खाजगी वाहतुकदारांच्या या प्रकाराबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आरटीओ विभागाने या दरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून जोर धरत  आहे.

  पुण्यातील स्वारगेट बस आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. १३ दिवसांच्या बेमुदत उपोषणानंतर मागण्या राज्य सरकारने मान्य न केल्यामुळे सोमवारीसुद्धा एसटी आगांर बंद आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version