सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरवात झाली आहे. गेली २ वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे शिवजयंती साजरी करता आली नाही. त्यामुळे यंदाची शिवजयंती ही धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरी होत आहे. सांगलीतील मावळा प्रतिष्ठान, रॉयल्स ग्रुपसह मराठा क्रांती मोर्चासह अनेक संघटनांकडून रात्री १२ वाजल्यापासून फटाक्यांची आतषबाजी करीत शिवरायांच्या जयंती उत्सवाला सुरवात करण्यात आली.
सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करीत जयंती सोहळ्याला सुरवात करण्यात आली. रात्री १२ वाजता महिलांनी छत्रपती शिवाजी राजांचा पाळणा गीत गाऊन छत्रपतींचा जन्मोत्सव साजरा केला. याचबरोबर आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण शिवतीर्थ उजळून निघाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बुलडाण्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईने परिसरात लखलखाट पसरल्याच पाहायला मिळाले. शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ही रोषणाई केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.