वसईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला चपलेने मारहाण

वसईत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला चपलेने मारहाण

वसईत चांदनसार विभागाचा शिवसेना विभाग प्रमुख जितेंद्र खाडे यांना एका महिला रिक्षा चालक महिलेने चांगलाच चोप दिला आहे. या महिला रिक्षा चालकाचे नाव मोनिका गुप्ता असे आहे.

शिवसेना पदाधिकारी जितेंद्र खाडे हा या महिलेला अश्लिल भाषा वापरत  वारंवार फोन करत होता. तसेच कोणी महिला मिळेल का? अशी विचारणा त्यांनी केली. आपण कोण बोलत आहेत असे या महिलेने विचारले असता त्याने स्वत:चे नाव न सांगता राजू म्हणून सांगितले.

शिवसेना पदाधिकारी जितेंद्र खाडे यांना चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रिक्षामध्ये जितेंद्र खाडे तसेच या महिलाचा मोबाईल क्रमांक देणारा शिवसेना वाहतूक सेनेचा माजी विभाग प्रमुख रोहित देवरे हे दोघे आहेत. रोहित देवरे याने जितेंद्र खाडे याला माहिती दिल्यामुळे मी त्या महिलेला विचारले आणि ही गोष्ट मला तू का सांगितली म्हणून जितू खाडे रोहित देवरे ला मारू लागला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version