14 एप्रिल हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान योगदानाची आठवण करून देणारा आहे, त्यामुळे हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो. हा केवळ एक उत्सव नसून, ज्ञानाचा सूर्य, समता आणि मानवी हक्कांच्या लढ्याचा उत्सव आहे. भीमरावांनी शिक्षणाच्या बळावर सामाजिक भेदभावाला झुगारून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि अर्थतज्ज्ञ म्हणून नावलौकिक मिळवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. शिक्षण, संघर्ष आणि संघटन यांच्या बळावर त्यांनी समाजाला नवी दिशा दिली. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी यासाठी त्यांनी लढा दिला. अशा या महामानवाला आदरांजली म्हणून आणि आपल्या प्रियजनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या या खास शुभेच्छा पाठवा….
ज्याने सर्वांना समजले एक समान, असे होते आमचे बाबा महान…
सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने,
स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
संघर्षाची गाथा महान,
समतेचा दिला संदेश महान,
बाबासाहेबांच्या जयंतीला,
करूया त्यांना मानाचा प्रणाम,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
शिका, संघटित व्हा,
संघर्ष करा, हा मंत्र सदैव जपूया,
बाबासाहेबांच्या विचारांनी नवं जग घडवूया,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
समता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविणाऱ्या
महासूर्याला विनम्र अभिवादन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
एक विचार, एक क्रांती
महामानवाला अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
दलितांच्या अंधाऱ्या जीवनात, प्रकाश ज्यांनी पेरला
अन्यायाविरुद्ध लढण्याचा, मंत्र ज्यांनी दिला
अशा महामानवास कोटी कोटी प्रणाम!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.