१५ डिसेंबरपासून सुरु होणार मुंबईतील सातवीपर्यंतच्या शाळा

१५ डिसेंबरपासून सुरु होणार मुंबईतील सातवीपर्यंतच्या शाळा

दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नवा व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत पालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांचे वर्ग उद्या सुरू होणार नसून येत्या १५ डिसेंबरपासून मुंबईतील सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार असल्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला होता. मात्र कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे राज्यातील सातवीपर्यंतचे वर्ग येत्या १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. तसेच शाळा सुरू करण्याबाबत प्रशासनाने नवी नियमावली जारी केली आहे.

काय आहे नियमावली?

  • सर्व शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण होणे अनिवार्य आहे.
  • नागरिकांच्या लसीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे.
  • राज्यात नागरिकांचे १००% लसीकरणासाठी प्रयत्न करावेत.
  • शाळेच्या परिसरात गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश देऊ नये.
  • शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यास शाळा दोन सत्रांमध्ये घ्याव्यात.
  • शाळेच्या वर्गातील एका बाकावर एकच विद्यार्थी बसणे अनिर्वाय आहे.
  • वर्गातील दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर असणे.
  • एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असणे बंधनकारक आहे.
  • शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे.
  • विद्यार्थ्यांना कोणतेही लक्षण आढळल्यास वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रांत तपासणीसाठी पाठवणे.
  • विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यास तत्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी.
  • शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version