शनी ग्रह पृथ्वीजवळ येणार

शनी ग्रह पृथ्वीजवळ येणार

मुंबई, २६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : अवकाश निरीक्षक, अभ्यासक यांच्या दृष्टीने सूर्यमालेतील एक महत्वाचा ग्रह म्हणजे शनी. शनीच्या भोवतीने असलेल्या कड्यामुळे शनीचे वेगळेपण खुलून दिसते.

येत्या २७ – २८ ऑगस्टला शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार आहे. यावेळी शनी ग्रह मोठा आणि तेजस्वी दिसणार आहे. तर ३१ ऑगस्ट रोजीची पौर्णिमा ही सुपरमून आणि ब्लू मून पौर्णिमा असणार आहे. या रात्री चंद्र मोठा आणि जास्त प्रकाशमान दिसेल. प्रतियुतीच्या आसपास शनी आणि पृथ्वी यांचे सरासरी अंतर कमी होईल. त्यामुळे या काळात शनीची सुंदर कडी चांगल्या प्रकारे दिसू शकतील. ही कडी साध्या डोळ्यांनी नव्हे तर दुर्बिणीने पाहावी लागणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version