संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

  शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले. त्यामुळे संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटीचे नेमके कारण काय? यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

  दिवाळीनिमित्त बारामतीतील कार्यक्रमादरम्यान संजय राऊत यांना शरद पवारांना प्रत्यक्ष भेटता आले नाही. शरद पवार आता मुंबईत आले आहेत त्यामुले आज सकाळच्या सुमारास संजय राऊत यांनी सिल्वर ओकवर पवारांची भेट घेतली. मात्र राऊत आणि पवार यांच्या बैठकीबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. त्यांच्या भेटीचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे यावर त्याच्या बैठकीत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे याप्रकरणाची इंटरव्हलनंतरची कथा मी लिहीणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे नेमकं संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटीत नेमकं काय घडलं असेल, कोणत्या विषयावर चर्चा झाली असेल यावर सर्वाचें लक्ष लागलेले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version