सरसंघचालक मोहन भागवत दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

सरसंघचालक मोहन भागवत दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

नाशिक: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मोहन भागवतांच्या उपस्थितीत १४ जुलै रोजी आयुर्वेद व्यासपीठ या संघटनेच्या चरक भवन या केंद्रीय कार्यालयाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण होणार असून १५ जुलै रोजी स्वामी सवितानंद यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात डॉ. भागवत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कोरोना प्रतिबंधामुळे निमंत्रित लोकांच्या उपस्थितीत हे दोन्ही कार्यक्रम होणार आहेत. नक्षत्र लॉन्स, गंगापूर रोड या कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित होणार आहे.

दरम्यान, सदर कार्यक्रम फेसबुक आणि यूट्युब लाइव्हद्वारेदेखील बघता येईल, अशी व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली असल्याची माहिती रा. स्व. संघाचे नाशिक शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version