सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे दोन वर्षांसाठी तडीपार

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे दोन वर्षांसाठी तडीपार

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना तडीपार करण्यात आले आहे. राजेश काळे यांच्यावर पुढील दोन वर्षांसाठी सोलापूरसह उस्मानाबद आणि इंदापूरमधून तडीपार करण्यात आले आहे.

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर सोलापूर शहर पोलिसात सात गुन्हे दाखल आहेत. विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने उपमहापौर काळे यांना तडीपार का करण्यात येऊ नये यासंदर्भातील नोटीस सोलापूर शहर पोलिसांकडून बजावण्यात आली होती. बुधवारी सकाळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विजापूर नाका पोलिसांनी उपमहापौर राजेश काळे यांना ताब्यात घेऊन तडीपार करण्यासाठी सोलापूर शहराच्या बाहेर नेण्यात आले आहे.

सोलापूर शहर आणि जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा तसेच इंदापूर तालुक्यातून उपमहापैर राजेश काळे यांना तडीपार करण्यात आले आहे. उपमहापौर राजेश काळे यांच्यावर करण्यात आलेली तडीपारची कारवाई दोन वर्षाकरिता आहे. त्यांना सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यासह शेजारील इंदापूर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version