पेनड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

पेनड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या पेनड्राईव्ह प्रकरणामुळे राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. दरम्यान, आता पेनड्राईव्ह प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. तसेच राज्याच्या गृह विभागाने अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला होता. गिरीश महाजन यांच्याविरोधात सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप करत त्यांनी पेनड्राईव्ह सादर केला होता. तर आता हेच पेनड्राईव्ह प्रकरण सीआयडीकडे सादर करण्यात आले आहे.

सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयातील व्हिडिओ क्लिपमध्ये विरोधकांविरोधात मविआ सरकार डाव आखत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. फडणवीसांनी १२५ तासांची व्हिडिओ रेकोर्डिंग केलेला पेनड्राईव्ह विधानसभेच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केला होता. तसेच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा दाऊद इब्राहिमसोबत संबंध आहेत तसेच एका सदस्याने महिला सामाजिक कार्यकर्त्यांवर केलेला बलात्कार असे आरोप करत माहितीचे संभाषण असलेले ऑडिओ क्लिपचे पेनड्राईव्ह फडणवीसांनी विधानसभेच्या अध्यक्षांना दिले होते. त्यामुळे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांकडे ही ऑडिओ क्लिप कुठून आली, याची माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच या प्रकरणाची चौकशी आता सीआयडीकडे सोपवण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version