यांना काय म्हणावं? खरंच या दळभद्री पाकिस्तान्यांनी भीक मागायची नवी पद्धत शोधून काढली

चित्रपटात पाकिस्तानमधील ज्या 'लियारी' भागाचे चित्रण दाखवण्यात आले आहे, तिथल्या रहिवाशांनी चक्क भारतीय निर्मात्यांकडे 500 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
यांना काय म्हणावं? खरंच या दळभद्री पाकिस्तान्यांनी भीक मागायची नवी पद्धत शोधून काढली

Pakistan Lyari Residents Demand 500 Crore from Dhurandhar Makers : भारतीय चित्रपटसृष्टीत रोज नवे विक्रम रचणाऱ्या 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने आता पाकिस्तानात एक अनपेक्षित हास्यास्पद परिस्थिती निर्माण केली आहे. बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवीन विक्रम प्रस्थापित करणाऱ्या धुरंधरने पाकिस्तानच्या डोक्याला झिणझिण्या आणल्याचे स्पष्ट दिसत आहे. या चित्रपटावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तान्यांच्या भ्रष्ट झालेल्या बुद्धीचा उजेड पडू लागला आहे. चित्रपटात पाकिस्तानमधील ज्या 'लियारी' भागाचे चित्रण दाखवण्यात आले आहे, तिथल्या रहिवाशांनी चक्क भारतीय निर्मात्यांकडे 500 कोटी रुपयांची मागणी केली आहे. या मागणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून भारतीय नेटकरी पाकिस्तानी लोकांची चांगलीच फिरकी घेत आहेत.

भारत: 'धुरंधर'ची ऐतिहासिक कमाई आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
भारतीय चित्रपट 'धुरंधर: द रिव्हेंज' ने अवघ्या 11 दिवसांत तब्बल 1,361 कोटी रुपयांची अवाढव्य कमाई केली आहे. या चित्रपटात एका भारतीय गुप्तहेराची कथा दाखवण्यात आली आहे, जो पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा करतो. मात्र, या चित्रपटाच्या यशानंतर एक अजब आणि तितकीच हास्यास्पद घटना समोर आली आहे. हा चित्रपट भारतात प्रचंड गाजत असतानाच, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पाकिस्तानी व्हिडिओवर भारतीयांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, "तुमची भीक मागण्याची पद्धत खूपच कॅज्युअल आहे," तर दुसऱ्याने "गाव वसले नाही तोच भिकारी गोळा झाले," असे म्हणत खिल्ली उडवली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 5,37,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा – Viral Video: आधी सामना जिंकला आणि मग बायकोचं मन! विजयानंतर किंग कोहलीचा रोमँटिक अंदाज; विराट-अनुष्काचा व्हिडिओ तुफान व्हायरल

पाकिस्तान: लियारीवासियांची अजब मागणी
पाकिस्तानमधील लियारी भागातील काही नागरिक या व्हिडिओमध्ये चक्क हक्क गाजवताना दिसत आहेत. "आमच्या शहराचे नाव वापरून निर्मात्यांनी हजारो कोटी कमावले, त्यामुळे त्यातील 500 कोटी रुपयांवर आमचा अधिकार आहे," असा दावा त्यांनी केला आहे. हे पैसे मिळाल्यास त्यातून लियारी शहराचा विकास करू, रस्ते, पाणी, वीज आणि अन्नासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊ, असे या लोकांचे म्हणणे आहे. स्वतःच्या देशातील सरकारकडे पायाभूत सुविधांची मागणी करण्याऐवजी भारतीय चित्रपटाच्या निर्मात्यांकडे कोट्यवधी रुपये मागण्याच्या या प्रकारामुळे त्यांची मोठी फजिती होत आहे.

चित्रपटाचे कथानक आणि वादाचे मूळ
चित्रपटात दाखवल्यानुसार, भारतीय गुप्तहेर पाकिस्तानच्या लियारी भागात जातो आणि तिथल्या गँगस्टर टोळीत सामील होऊन आपले मिशन पूर्ण करतो. लियारी हे शहर त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसाठी ओळखले जाते, मात्र आता याच नावाचा वापर केल्याचा 'रॉयल्टी' दावा तिथले लोक करत आहेत. Instagram वरील 'trolls_official' या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, त्यात पाकिस्तानी क्रिएटर लोकांच्या प्रतिक्रिया घेताना दिसत आहे. मूलभूत सुविधांसाठी चक्क दुसऱ्या देशातील चित्रपट निर्मात्यांसमोर कटोरा घेऊन उभे राहण्याच्या या फुकटखाऊ पद्धतीची जगभर चर्चा होत आहे.

हेही वाचा – Delivery Boy Stands Frozen : धक्कादायक! ब्लिंकइटचा डिलिव्हरी बॉय एकाच जागी झाला फ्रीझ; नेटकऱ्यांनी व्यक्त केली भारतात झोम्बी ड्रगची भीती

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version