ज्ञानवापी मशिदीवर पुढील सुनावणी २६ मे रोजी

ज्ञानवापी मशिदीवर पुढील सुनावणी २६ मे रोजी

ज्ञानवापी मशिदीप्रकरणी मंगळवारी वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षबाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. त्यानुसार ज्ञानवापी मशिदीवर पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार आहे.

सुनावणीदरम्यान, हिंदू पक्षाने सर्वेक्षणात समोर आणलेले पुरावे न्यायालयाने पाहावेत, त्यानंतर पुढील निर्णय जाहीर करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. तर मुस्लिम पक्षाने खटल्याच्या वैधतेवर सुनावणीची मागणी केली. तसेच, ज्ञानवापी मशिदीप्रकरणी सुनावणी होण्यापूरवी वाराणसी न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ज्ञानवापी मशिदीप्रकरणी हिंदू पक्षाचा युक्तिवाद

  • शृंगार गौरीच्या रोजच्या पूजेची मागणी
  • वाजुखान्यात सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या पूजेची मागणी
  • नंदीच्या उत्तरेकडील भिंत तोडून डेब्रिज हटवण्याची मागणी
  • शिवलिंगाची लांबी, रुंदी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षणाची मागणी
  • वाळूखान्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी

ज्ञानवापी मशिदीप्रकरणी मुस्लिम पक्षाचा युक्तिवाद

  • वजूखाना सील करण्यास विरोध
  • १९९१ कायद्यांतर्गत ज्ञानवापी सर्वेक्षण आणि खटल्यावर प्रश्नचिन्ह

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version