नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी 

नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी 

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून अटक करण्यात आली. आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक करण्यात आले. त्यानंतर मलिकांना न्यायलयात हजर करण्यात आले असून न्यायलयात नवाब मलिकांचे वकील आणि ईडीचे वकील यांच्यात चार तासांच्या युक्तीवादानंतर पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत आठ दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे ३ मार्चपर्यंत ईडीकडून नवाब मलिकांची चौकशी करण्यात येणार आहे. युक्तीवाद संपल्यानंतर एक तासाने न्यायालयाने निकाल जारी केला आहे.

‘मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाही’

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून जोर धरत आहे. याबाबत शरद पवारांच्या उपस्थितीत सिल्ह्वर ओकवर वरिष्ठांची बैठक पार पडली. या बैठकीत नवाब मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाही, असे आदेश शरद पवारांनी दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version