नवाब मलिक पत्रकार परिषद : मुन्ना यादव कोण आहे?

नवाब मलिक पत्रकार परिषद : मुन्ना यादव कोण आहे?

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांचा दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचा आरोप केला. यावर फडणवीसांनी केलेले आरोप फेटाळले असून आज त्यांनी काही खुलासे केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे मुन्ना यादवसोबत काय संबंध आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.

मुन्ना यादव कोण आहे?

  मुन्ना यादव हे भाजपचे माजी नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे समर्थक आहेत. मुन्ना यांची पत्नी लक्ष्मी या विद्यमान नगरसेविका आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर मुन्ना हे महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. मुन्ना यादवच्या विरोधात नागपूरमध्ये अनके गुन्हे दाखल आहेत.

मुन्ना यादववरील आरोप

  २०१६मध्ये मुन्ना यादव आणि सहकार्यांनी तरुणाला धमकी देत खंडणी मागितल्याचा आरोप मुन्ना यादव यांच्यावर करण्यात आला आहे. त्याच वर्षी मुन्ना यादवच्या भावाने दलित कामगाराचा पाय तोडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच एका भूखंड व्यवहारात महिलेला धमकी दिल्याप्रकरणी मुन्ना यादवच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version