‘नवनीत राणांना तुरुंगात हीन वागणूक’ – देवेंद्र फडणवीस

‘नवनीत राणांना तुरुंगात हीन वागणूक’ – देवेंद्र फडणवीस

हनुमान चालीसा पठण आंदोलनाप्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यावरून भाजपाने सरकारवर टीका केली आहे. सोमवारी महाराष्ट्र भाजपा मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी खासदार नवनीत राणा यांना कोठडीत अमानवीय वागणूक देण्यात आली असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवनीत राणा यांना तुरुंगात अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात आली. नवनीत राणांना पिण्याचे पाणी दिले जात नाही तर, वॉशरुमला जाऊ दिले नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे, असे फडणवीस म्हणाले.

तसेच, एक महिला हनुमान चालीसा म्हणते म्हणून १२४ (अ) अंतर्गत तुरुंगात टाकलं जात असेल आणि दलित असल्याची जाणीव करून दिली जात असेल तर या राज्याचं पुरोगामित्व संपलेले आहे, असेही फडणवीस म्हणाले. तसेच नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित त्यांना दिली जात असलेल्या वागणुकीबाबत तकार केली असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version