मुंबई: मुंबईकरांना आजपासून कोरोना निर्बंधांतून दिलासा मिळाला आहे. मुंबईचा पॉझिटिव्ही रेट १ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत मुंबई महापालिकेने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. यानुसार मुंबईत आजपासून आठवड्याचे सातही दिवस दुकानं रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसंच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सही सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र मॉल्सबाबत पालिकेच्या आदेशात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
काय आहेत नवे नियम?
कोरोना निर्बंध असलेले जिल्हे:
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.