कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन

कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन

शिवराज्याभिषेकदिनी सर्वत्र सोहळा साजरा करण्यात आला. तर, कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आले होते. त्यामुळे, मंगळवारी (दि. ६ जून) दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर मंगळवारी या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. औरंगजेबाचा संदर्भ देऊन काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. त्यांनी बुधवारी (दि. ७ जून) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले आहेत. पोलिसांनी संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. आक्रमक झालेल्या हिंदुत्वादी संघटनांनी शहरातील काही भागांत तोडफोड केल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली आहे. तसंच या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याचंही चित्र पाहायला मिळालं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version