राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पडला मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पडला मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्र्यांचा नावाचा विसर पडला. इंदापूर येथील कार्यक्रमाता दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला आहे. त्यानंतर व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांनी दत्तात्रय भरणे यांची चूक लक्षात आणून दिल्यानंतर भरणे यांनी सारवासारव केली.

इंदापूर येथील एका कार्यक्रमामध्ये सोमवारी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, महाविकास आघाडीचे जे घटक आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील. असे बोलताच व्यासपीठावर उपस्थितांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत अशी आठवण  त्यांना करून दिली.

दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केल्यानंतर डोक्यात खूप विचार असल्यामुळे होते असे कधी कधी, असे म्हणत दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावावरून सारवासारव केली. भरणे यांचा कार्यक्रमातील हा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version