डोंबिवली फडके रोडवर नववर्ष स्वागत यात्रा

डोंबिवली फडके रोडवर नववर्ष स्वागत यात्रा

गेली दोन वर्ष सर्वत्र कोरोनाचे सावट असल्यामुळे राज्यात निर्बंध लादण्यात आले होते. तसेच सण-उत्सवसुद्धा घरीच साजरे करावे लागले. मात्र, यंदाचा गुढीपाडवा म्हणजेच मराठी नुतन वर्ष निर्बंधमुक्त असल्यामुळे राज्यात नागरिकांमध्ये मोठ्या उत्साह पाहण्यास मिळत आहे. राज्यसरकारकडून राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी गुढीपाडव्याच्या शोभायात्रा निघाल्या.

नववर्ष स्वागत शोभायात्रेसाठी सर्वात प्रथम डोंबिवलीची आठवण येते. गुढीपाडव्याला निघणारी शोभायात्रा ही डोंबिवलीची सांस्कृतिक ओळख आहे. मराठी नववर्षाची शोभायात्रा काढण्याची परंपरा डोंबिवलीतूनच सुरू झाली आहे. मात्र, गेली दोन वर्षे राज्यात कोरोनाचे संकट असल्यामुळे गुढीपाडव्याच्या शोभायात्रेवर बंधन घालण्यात आले होते. डोंबिवलीत शोभायात्रा काढण्यास परवानगी मिळाली असली तरी डोंबिवलीमध्ये शोभायात्रेवर नियम कायम आहेत. डोंबिवलीमध्ये शोभायात्रेत केवळ मुख्य चौकांमध्ये ढोलवादनाला परवानगी देण्यात आली आहे.

डोंबिवलीतील फडके रोडवर नववर्ष स्वागत शोभायात्रा उत्साहात काढण्यात आली. या शोभायात्रेचा आढावा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी गायत्री पिसेकर यांनी घेतला आहे.

पाहा हा व्हिडिओ:

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version